शिक्षणाच्या माहेर घरात चाललंय काय.
पालिकेच्या शाळेत मुलांनी शिकायचं कसं
सात वर्गासाठी केवळ दोन शिक्षक
शाळेत विद्यार्थी 200 शिक्षक दोनच
पुणे हे विद्येचे माहेरघर असून गेली बारा वर्ष या ठिकाणी शिक्षकांचा तुटवडा भासत आहे…पुणे मनपा च्या इंग्रजी माध्यम च्या पुणे मधे 50 शाळा असून या ठिकाणी इंग्रजी माध्यम चे मोफत शिक्षण भेटत असल्यामुळे गोर गरीब काम मजूर यांची मुले याठिकाणी शिक्षण घेत असतात…शाळेची फी भरून शिक्षण घेणे या मजुरांना कामगारांना परवडत नसल्यामुळे मनपा च्या शाळेत आपले मुल इंग्रजी भाषेतून शिकतील या हेतूने हे पालक आपल्या पाल्यांना या मनपा च्या शाळेत दाखल करतात..परंतु दाखल केल्यानंतर या मुलांना शिकवायला शिक्षकच नाहीत..
एक शिक्षक तीन वर्ग पाहतो अशी परिस्थिती सध्या आहे.मुल येतात भात खातात आणि घरी जातात…घरी गेल्यावर विचारले काय शिकवले तर काहीच नाही हेच उत्तर मुलांकडून ऐकायला भेटते…2011 ला कायम शिक्षक ची भरती केली त्यानंतर 2015 पासून अत्यंत अल्प तुटपुंज्या मानधनावर हंगामी शिक्षक ची नेमणूक करण्यात आली…
पुणे सारख्या ठिकाणी अल्प तुटपुंज्या मानधनावर काम करणे शिक्षकांना परवडत नसल्यामुळे बऱ्याच जणांनी हंगामी शिक्षक म्हणून नोकरी सोडून गावी शेती करू..शेळ्या पाळू असे म्हणत थेट गाव गाठले..या वर्षी देखील पुणे मनपा ने 260 जणांची हंगामी शिक्षक ची भरती ची जाहिरात दिली होती .
परंतु फॉर्म फक्त 240 आले असल्यामुळे त्यात TET ची अट असल्यामुळे बरेच फॉर्म बाद करण्यात आले आणि पुणे मनपा ला 193 हंगामी शिक्षक ची यादी लावावी लागली त्यात 20 हजार अनामत रक्कम भरावी लागत असल्यामुळे आणि पगार वेळेवर होत नसल्यामुळे बऱ्याच उमेदवारांनी शाळा रुजू केली नाही…
त्यानंतर शिक्षक नाहीत अशी आरडाओरड झाल्यामुळे परत 22 उमेदवारांची यादी लावण्यात आली त्यातील देखील बरेच जन रुजू झाले नाहीत…आज मितीला मुलांना शिकवायला शाळेत शिक्षकच नाहीत….
जे म्हणत होते पगार वेळेवर होत नाहीत मनपा ची कायम भरती काढून मुलांना शिकवायला कायम शिक्षक ची भरती करा त्यांना या भरती मधे डावलले गेले… ही हंगामी भरती चुकीची लिस्ट लावून झालेली आहे.
हा मेसेज एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर करा की शिक्षणमंत्री/ मुख्यमंत्री पर्यंत पोहोचला पाहिजे